मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने नुकतेच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. शर्मिष्ठा आई झाली असून तिला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर तिच्या घरी पाळणा हलला आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर बारश्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लेकीचं नावदेखील सांगितलं.
शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई नुकतेच आईबाबा झाले आहेत. मोठ्या थाटामाटात त्यांनी बाळाचं बारसं केलं. यावेळी इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित होते. त्यांनी बाळाचं नाव रुंजी ठेवलंय. शर्मिष्ठाने ही खुशखबर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, आम्हाला मुलगी झाली आहे. रुंजी. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
शर्मिष्ठाने सांगितलं लेकीच्या नावाचा अर्थसोशल मीडियावर शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारश्याचे बरेच व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. त्यातील एका व्हिडीओत अभिनेत्रीने तिच्या नावाचा अर्थदेखील सांगितलाय. ती म्हणाली की, रुंजी या नावाचा अर्थ अकस्मात सौंदर्य. दुसरा अर्थ म्हणजे मनात रुंजी घालणं, मनात सतत घोळत राहणे.
२०२० साली शर्मिष्ठा-तेजसने केलं लग्नशर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी लॉकडाउनमध्ये लग्न केले होते. ऑक्टोबर २०२०मध्ये लग्न करून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता रुंजीचे आई-बाबा झाल्यानंतर त्यांची नवी इनिंग सुरू झाली आहे.