Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर रिद्धिमाने अफवांना दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 20:21 IST

‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रिद्धिमा तिवारी सध्या चर्चेत आहे. त्यास कारणही तसेच असून, म्हणे रिद्धिमा ही ...

‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रिद्धिमा तिवारी सध्या चर्चेत आहे. त्यास कारणही तसेच असून, म्हणे रिद्धिमा ही हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान याला डेट करीत आहे. जेव्हा तिला याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, माझे रिलेशनशिप स्टेटस सध्यातरी प्रायव्हेट आहे. कारण तुम्ही कोणाला डेट करत असाल तर त्यामध्ये प्रायव्हसी असायलाच हवी. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्नाचे जाहीर उत्तर देणे मला फारसे आवडत नाही. मला असे वाटते की, अशाप्रकारच्या अफवांमुळे तुमचे एखाद्या व्यक्तींबरोबरचे इक्वेशन बदलायला नको. मध्यंतरीच्या काळात रिद्धिमाला हृतिकची वहिनी असे म्हटले जात होते. रिद्धिमाच्या मते, आपण कोणालाही काही बोलण्याविषयी रोखू शकत नाही. अशाप्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करणे हे मी शिकले आहे. माझे शाळा, कॉलेजमधील बरेचसे मित्र आजही माझ्या संपर्कात आहेत. सोशल मीडियावर मी त्यांच्याबरोबरच नेहमीच फोटो शेअर करीत असते. याचा अर्थ मी त्यांना डेट करते का? मला ईशानबरोबर पिक्स टाकायला आवडतात. कारण तो खूपच गूड लुकिंग आहे. मात्र, काहींनी याचा चुकीचा अर्थ काढला आहे, असेही तिने सांगितले आहे.