Join us

अखेर यश का परतला? यश जुई कधी देणार गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 11:19 IST

अस्सं सासर सुरेख बाई मालिकेत काहि दिवसांपूर्वी कामाच्या निमित्त यश( संतोष जुवेकर ) राजस्थानला निघून गेल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे ...

अस्सं सासर सुरेख बाई मालिकेत काहि दिवसांपूर्वी कामाच्या निमित्त यश( संतोष जुवेकर ) राजस्थानला निघून गेल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे त्यानंतर तो बरेच दिवस तो मालिकेत झळकलाच नाही.मात्र एका गोड बातमीने यशला घरापर्यंत खेचुन आणलेच. यशची बहिण रेखा ही आई होणार आहे ही गोड बातमी यशला कळताच तो थेट राजस्थानहून घरी परतला आहे.यश घरी येणार असल्याच्या आनंदात त्याच्या स्वागतासाठी महाजन कुटूंबही स्वागताच्या तयारीला लागला आहे. त्याच्यासाठी घराला सजवण्यात आले आहे. सध्या महाजन कुटूंबाकडे आनंदाचे महोल आहे. एक तर रेखा आई होणार नव्या पाहुण्याचे घरात आगमन होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे यश परतणार आहे. त्यामुळे महाजन कुटूंबाता आनंदच आनंद पाहायला मिळतोय. यात सगळ्यात जास्त खूष आहे ती जुई तिने दुहेरी गोष्टींचा आनंदा साजरा करण्यासाठी घरात फुगे,बाळाचे फोटो लावून चाळीतल्या दहा बाय दहा घराचेही रूप पालटले आहे. मात्र महाजन कुटूंबाला आता यश आणि जुई गोड बातमी कधी देणार याच्या प्रतिक्षेत आहेत.