कलर्स मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. 'या गोजिरवाण्या घरात', 'कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक', 'अस्स सासर सुरेख बाई', 'घाडगे अँड सून' अशा मालिकांनी प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. कलर्स मराठीवर नुकतंच 'बिग बॉस मराठी ५'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सध्या कलर्स मराठीवरील मालिका अचानक बंद पडत असल्याचं दिसतं. काहीच दिवसांपूर्वी 'अबीर गुलाल' मालिका बंद पडल्याची बातमी आली. आता कलर्स मराठीवरील आणखी एक मालिका बंद पडण्यार असल्याचं समजतंय.
ही मालिका होणार बंंद?
कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' या मालिकेनंतर आता आणखी एक मालिका बंद होणार आहे. या मालिकेचं नाव म्हणजे 'दुर्गा'. रुमानी खरे आणि अंबर गणपुले यांची प्रमुख भूमिका असलेली केवळ तीन महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु असतानाच ही मालिका सुरु झाली. या मालिकेत अंबर-रुमानी सोबतच नम्रता प्रधान, राजेंद्र शिरसाट, वृंदा अहिरे या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.
कलर्स मराठीवर सुरु होत आहेत नवी मालिका
कलर्स मराठीवर मालिका निरोप घेत असून नव्या मालिका सुरु होत आहेत. यापैकी मोठी मालिका म्हणजे अशोक सराफ यांची 'अशोक मा.मा.' या नवीन मालिकेत नेहा शितोळे, रसिका वाखारकर, शुभवी गुप्ते हे कलाकार झळकणार आहेत. अशोक सराफ या मालिकेच्या निमित्ताने अनेक वर्षांनी टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. २५ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे.