Join us

तब्बल ८ वर्षांनी मुक्ता बर्वे आणि उमेश कामत आले एकत्र, दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:25 IST

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत तब्बल ८ वर्षांनी एकत्र आले आहेत. ते दोघे लग्न पाहावे करून या चित्रपटात पहायला मिळाले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत तब्बल ८ वर्षांनी एकत्र आले आहेत. ते दोघे लग्न पाहावे करून या चित्रपटात पहायला मिळाले होते. त्यानंतर आता हे दोघे छोट्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघे सोनी मराठीवर नव्याने दाखल होणारी मालिका 'अजूनही बरसात आहे'मध्ये पहायला मिळणार आहेत. 

 मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली आहे. तर  उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा  पाहायला मिळणार आहे.

इतकेच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असे वाटते आहे. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल!

'अजूनही बरसात आहे' ही मालिका १२ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :मुक्ता बर्वेउमेश कामत