Join us

‘द व्हॉइस’शोचे परीक्षक बनणार अदनान सामी आणि अरमान मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:26 IST

‘स्टार प्लस’ वाहिनीवरून लवकरच प्रसारित केला जाणारा ‘द व्हॉइस’ या शोची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या शोसाठी मेकर्सकडून कोणतीही कसर शिल्लक ठेवली जात नाहीय

‘स्टार प्लस’ वाहिनीवरून लवकरच प्रसारित केला जाणारा ‘द व्हॉइस’ या शोची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या शोसाठी मेकर्सकडून कोणतीही कसर शिल्लक ठेवली जात नाहीय.  आता या कार्यक्रमाला अधिकच आकर्षक करण्यासाठी आजच्या पिढीचा लाडका गायक अरमान मलिक आणि पार्श्वगायक अदनान सामी हे लवकरच या कार्यक्रमातील परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  

या कार्यक्रमाच्या सूत्राने सांगितले, “‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात देशातील सर्वोत्कृष्ट संगीतकार सहभागी होणार आहेत. ज्या अरमान मलिकने एका रि अ‍ॅलिटी कार्यक्रमात एक स्पर्धक म्हणून आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला होता, तोच अरमान आज व्यासपिठाच्या दुसऱ्या टोकाला एक परीक्षक म्हणून बसलेला दिसेल आणि तो या कार्यक्रमातील स्पर्धकांना मार्गदर्शन करील. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुनासिक आवाजाने जगभरात आपली ओळख निर्माण केलेल्या अदनान सामी हा आपल्या वैयक्तिक जीवनातील काही किस्से आणि घटना या कार्यक्रमात सांगणार आहे. तसंच उत्कृष्ट आणि व्यावसायिक गायक होण्यासाठी तो स्पर्धकांना मौलिक सूचना करणार आहे. हे दोघेही या कार्यक्रमात काही नवं योगदान करणार असून परीक्षक म्हणून काम करण्यास ते उत्सुक बनले आहेत.”

अरमान मलिक आणि अदनान सामी यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम म्हणजे संगीताची भव्य मैफलच ठरेल. हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम दिवसेंदिवस प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवीत आहे.