Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आदित्य नारायणने 'या' अभिनेत्रीशी लग्न करावे अशी आहे त्याच्या आजीची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 10:50 IST

सारेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात नुकतीच स्पर्धकांच्या आजीआजोबांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणची 95 वर्षांची आजीदेखील ...

सारेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात नुकतीच स्पर्धकांच्या आजीआजोबांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणची 95 वर्षांची आजीदेखील या कार्यक्रमात त्याला खास भेटायला आली होती. आजीला कार्यक्रमात पाहून आदित्य खूपच खूश झाला होता. त्याने त्याच्या खास शैलीत सगळ्यांशी आजीशी ओळख करून दिली. ओळख करून देताना तो म्हणाला, ही माझे पहिले प्रेम, एकमेव गर्लफ्रेंड आणि माझ्या हृदयावर राज्य करणारी अशी एकमेव स्त्री आहे. आदित्यच्या आजीला त्याचा प्रचंड अभिमान आहे. त्याने लहान वयात जे कर्तृत्व गाजवले आहे, त्याबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. त्या आदित्यसाठी सारेगमपा लिटल चॅम्पसचे सगळे भाग पाहातात. आदित्यच्या आजीचे त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे, त्या सांगतात, "माझा मुलगा उदितवर माझे प्रचंड प्रेम आहे यात काही शंकाच नाही. पण त्याच्यापेक्षा माझे अधिक माझ्या नातवावर म्हणजेच आदित्यवर प्रेम आहे. माझा नातू अतिशय देखणा आहे आणि त्यामुळे त्याने एखाद्या सुंदर अभिनेत्रीसोबत लग्न करावे असे मला नेहमी वाटते. वय वाढत असल्याने मी अनेक वेळा आजारी पडते. पण मी आजारी असल्यावर आदित्य कितीही कामात व्यग्र असला तरी मला भेटायला येतो. तसेच मला अनेक गाणी म्हणून दाखवतो. त्याच्यामुळेच मी माझ्या आजारपणातून लवकरात लवकर बरी होते." आदित्यची आजी या खूप चांगल्या गायिका आहे. उदित नारायण यांना त्यांच्याकडूनच गायनाचा वारसा लाभला आहे. त्या स्वतः उत्तम लोकसंगीत गातात. त्यांनी या कार्यक्रमात एक लोकसंगीतही सादर केले. आजही त्यांच्या आवाजात तितकीच ताकद असल्याचे त्यांच्या गाण्यातून सगळ्यांना जाणवले.