Join us
Daily Top 2Weekly Top 5

उदित नारायण यांच्या हिट गाण्यावर लग्नात डान्स करणार आदित्य, सांगितला असा आहे प्लान

By गीतांजली | Updated: November 5, 2020 12:31 IST

आदित्य आणि श्वेताची रोका सेरेमनी नुकतीच पार पडली.

गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने नुकतेच आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल सोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. आता दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यावर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला. आदित्य आणि श्वेताची रोका सेरेमनी नुकतीच पार पडली. 

आदित्य नारायण 1 डिसेंबर 2020ला बोहल्यावर चढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. उदित नारायण यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, आपल्या एकुलत्या एका मुलाचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात करायची इच्छा होती परंतु कोरोनामुळे हे शक्य होईल असे दिसत नाही. त्यांनी सांगितली काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुंबईतल्या एका मंदिरात लग्न होणार आहे.ज्यात फक्त जवळचे नातेवाईकांना आमंत्रित केले जाईल. 

आदित्य नारायण सांगितले की, तो श्वेतासोबत वडील उदित नारायण यांच्या 'जो जीता वही सिंकदर' सिनेमातील पहला नशा गाण्यावर डान्स करताना दिसेल. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आदित्यने श्वेताशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल चर्चा केली. आदित्य म्हणाला की, 'शपिता' चित्रपटाच्या सेटवर मी श्वेताला भेटलो. आमच्यात चांगली बॉन्डिंग झाली. मग हळू हळू मी श्वेताच्या प्रेमात पडू लागलो. सुरुवातीला तिला फक्त मैत्री करायची होती, कारण आम्ही दोघे तरुण होतो आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या नातंही खूप चढउतार आले. माझ्या आई-वडिलांना श्वेता खूप आवडते '

टॅग्स :आदित्य नारायण