Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘काळभैरव रहस्य-2’च्या चित्रीकरणादरम्यान आदिती गुप्ता झाली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 14:21 IST

‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत गौतम रोडे, आदिती गुप्ता, सिध्दान्त कर्णिक, विनिता मलिक, सीमा पांडे, सोनिया सिंह, आयम मेहता हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत.

मानवी जीवनातील विविध अनुभवांचा लाभ घेता येत असल्याने एखाद्या कलाकाराचे जीवन मजेदार बनते. ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत अर्चनाची भूमिका रंगविण्यास सुरुवात केल्यपासून आदिती गुप्ता या अभिनेत्रीनेही असे अनेक अनुभव घेतले आहेत. या मालिकेत ती अर्चनाची भूमिका रंगवीत असून त्यात ती स्कूटी चालवीत असते.आदिती गुप्ता वास्तव जीवनातही गेली अनेक वर्षे स्कूटी चालवीत आहे. तिला ही स्कूटर फार आवडते. या मालिकेच्या एका प्रसंगात तिला स्कूटी वेगात चालवायची होती करण ती तिचा पाठलाग करणार्‍्या एका माणसापासून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करीत असते. पण चित्रीकरणादरम्यान वेगाने स्कूटी चालविताना आदितीचे नियंत्रण सुटून ती त्यवरून खाली पडली आणि जखमी झाली. सुदैवाने तिने हेल्मेट घातले होते आणि तिला अन्य काही मोठी दुखापत झाली नाही. निर्माते आणि अन्य कर्मचार्‍्यांनी तिची तातडीने काळजी घेतली.या घटनेसंदर्भात आदिती म्हणाली, “मी लहान असल्यापासून स्कूटी चालवीत असून आजवर अनेकदा मी त्यावरून पडलेही आहे. हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून मी तयाकडे फारसं लक्ष देत नाही. मालिकेतला हा प्रसंग चांगल्या प्रकारे चित्रीत झाला असून त्यातील लाल रंगाची स्कूटी ही माझ्या जीवनाचा एक भाग बनली आहे कारण मी ती रोजच चालवीत असते.”

‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत गौतम रोडे, आदिती गुप्ता, सिध्दान्त कर्णिक, विनिता मलिक, सीमा पांडे, सोनिया सिंह, आयम मेहता हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. या मालिकेत आयम हा राजगुरूची भूमिका साकारणार असून तो काळभैरव मंदिराचा पुजारी आहे. एका नव्या टप्प्याचा प्रारंभ करण्यास सिद्ध झालेला आयम या नव्या भूमिकेत अचूक शोभून दिसतो.  

टॅग्स :काल भैरव रहस्य २