आदिनाथ लाजला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 15:03 IST
मराठी इंडस्टीची हॉट, कूल, परफेक्ट आणि रोमॅण्टीक असलेली जोडी म्हणजेच उर्मिला कोठारे व आदिनाथ कोठारे यांची
आदिनाथ लाजला....
मराठी इंडस्टीची हॉट, कूल, परफेक्ट आणि रोमॅण्टीक असलेली जोडी म्हणजेच उर्मिला कोठारे व आदिनाथ कोठारे यांची. या दोन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या नात्याने देखील प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. त्यांचे हे नाते किती सुंदर व मैत्रिपूर्ण आहे हे एका सोशलमिडीयावर अपडेट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसले. या व्हिडीओमध्ये कारमधून प्रवास करताना मज्जा मस्ती म्हणून या मॅगो डॉलीने डोळ््यावरचा गॉगल उतरविताना एकदम गाव के छोरीप्रमाणे झक्कास व अॅटीटयूड लूकमध्ये डोळा मारला. तिची ही अदा पाहता आदिनाथ ही मिश्कीलपणाने लाजला. त्याच्या या लाजण्याच्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना हसू आवरणार नाही हे नक्की.