Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदा खान या मालिकेत साकारणार सिताराची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:17 IST

कलर्स वाहिनीवर 'विष या अमृत' ही नवीन मालिका लवकरच दाखल होणार आहे.

ठळक मुद्देअदा खान दिसणार विष कन्येच्या भूमिकेत'विष या अमृत' मालिका लवकरच होणार दाखल

कलर्स वाहिनीवर 'विष या अमृत' ही नवीन मालिका लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री अदा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत सितारा नामक विष कन्येच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका विषकन्येच्या लोककथेवर आधारीत आहे. मला रोमांचक व आव्हानात्मक भूमिका साकारण्याकडे कल असल्याचे अदा खान म्हणाली. 

या मालिकेबद्दल अदा खान हिने सांगितले की, 'फँटसी आणि सुपर नॅचरल प्रकार प्रेक्षकांना पाहायला अतिशय आवडतात. या मालिकेची संकल्पना अतिशय नवीन आहे आणि त्याचे मी याआधी केलेल्या कोणत्याही मालिकेशी साम्य नाही. एक अभिनेत्री म्हणून मलासुद्धा वैयक्तिकरित्या सिताराचा प्रवास करून पहायचा आहे आणि मला खात्री आहे की तो अतिशय रोमांचक असणार आहे.'अदा पुढे म्हणाली की, 'मला नेहमीच इंटरेस्टिंग व आव्हानात्मक भूमिका करायला फार आवडतात'. 'विष या अमृत' मालिकेत सितारा नामक एका तरूण मुलीचा प्रवास वर्णन करण्यात आला आहे. जिला माहित नाही की ती विषकन्या आहे. पण काळ पुढे सरकत असताना तिला तिच्या शक्तीची जाणीव होऊ लागते आणि चांगले आणि वाईट मधील काहीतरी निवडण्याची वेळ तिच्यावर येते. तिच्या शक्ती प्राणघातक बनतील की ते जीवनदायी औषध ठरेल? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. विष या अमृत ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. अदा खानला विष कन्येच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :विष या अमृत मालिकारंग