Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवीन ट्विस्ट, नंदिता वहिनीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 18:09 IST

तुझ्यात जीव रंगलामध्ये लवकरच नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामध्ये लवकरच नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सगळ्यांचा हिसाब चुकता करायला नंदिता वहिनी पुन्हा एकदा या मालिकेत एन्ट्री घेत असल्याचे नुकतेच एका प्रोमोत पाहायला मिळाले. मात्र वहिनी साहेबांच्या भूमिकेत कोण अभिनेत्री पहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. कारण नंदिता वहिनीची भूमिका गाजवणारी धनश्री काडगावकर प्रेग्नेंट असल्यामुळे मालिकेतून निरोप घेतला होता. 

तुझ्यात जीव रंगला मालिकेत आता नंदिता वहिनीच्या भूमिकेत अभिनेत्री माधुरी पवार दिसणार आहे. झी युवा वाहिनीवरील अप्सरा आली या शोची विजेती म्हणून माधुरीने आपले नाव गाजवले आहे. नृत्याची विशेष आवड असलेल्या माधुरीच्या टिकटॉकवरील नृत्याच्या अदाकारीने अनेक चाहत्यांना घायाळ केले होते. तिची हीच अदाकारी अनेक लावणी नृत्यामधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

View this post on Instagram

नमस्कार मी अभिनेत्री माधुरी पवार मला नक्की बघायचे आता तुझ्यात जीव रंगला या सिरीयल मध्ये प्रमुख खलनायिकेची ची भूमिका साकारताना , वहिणीसाहेब,,,,,,,,,, सावधानतेचा इशारा: २७ तारखेला लय डेंजर वादळ परत येतंय! तेव्हा बघायला लागतंय, तुझ्यात जीव रंगला! संध्याकाळी ७:३० वाजता! आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवर... 💃 *आपलीच माधूरी पवार* #madhuripawar #madhuripawarvideo #reelsinstagram #reelsindia #reelsvideo #reels #reelstrending #reelsforyou #foryou #foryoupage #trending #trendingsong #trendingvideo #trendingindia #viralvideo #hotvideo #tiktokindia #videostar #video #videos #hindisongs #hindivideosongs #roposostar #mxtakatak #snackvideo #moj #zilivideo #gaanahotshots #joshvideos

A post shared by 𝐦𝐚𝐝𝐡𝐮𝐫𝐢 𝐩𝐚𝐰𝐚𝐫 (@madhuripawarofficial) on

मूळची सातारा जिल्ह्याची असलेली माधुरी आपल्या आई वडिलांच्या प्रोत्साहनाने नृत्यात निपुण झाली. वडील जोतिराम पवार गवंडी काम करत. त्यामुळे ज्या गावी काम त्या गावी त्यांचा मुक्काम असायचा. तिथेच त्यांनी आपल्या मुलीला माधुरीला नृत्याचे धडे दिले पुढे यातूनच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा तिने गाजवल्या.

नृत्यासोबतच अभिनयाचे धडेही तिने गिरवले आहेत. अजय गोगावले यांनी गायलेल्या पावसाळी या ढगांनी म्युझिक व्हिडीओमध्ये माधुरी झळकली आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून माधुरी मालिकेत काम करताना दिसणार आहे. वहिनी साहेबांच्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाधनश्री काडगावकर