Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 15:15 IST

अभिनेत्री चिन्मयी सुमीतने आभाळमाया या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. नव्वदीच्या दशकात आभाळमाया ही मालिका प्रचंड गाजली होती. ...

अभिनेत्री चिन्मयी सुमीतने आभाळमाया या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. नव्वदीच्या दशकात आभाळमाया ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या मालिकेतील चिन्मयीच्या भूमिकेचेदेखील अनेकांनी कौतुक केले होते. चिन्मयी गेली अनेक वर्षँ मराठी इंडस्ट्रीत असून तिने अनेक मराठी नाटकांत, चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून तिने छोट्या पडद्यावर काम केले नाही. खरे तर गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयापासूनच दूर आहे. ती खूपच कमी नाटकांत, चित्रपटात झळकते. पण आता अनेक वर्षांनंतर ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. बन मस्का या मालिकेत लवकरच एक एंट्री होणार आहे. या मालिकेत आता मैत्रयीची आई प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मयी या मालिकेत येणार असून चिन्मयी मैत्रयीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलांना मोकळीक न देता त्यांच्यासोबत कडक वागले पाहिजे असे तिचे मत आहे.चिन्मयी सुमीत ही प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवनची पत्नी आहे. त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वी एका नाटकात एकत्र काम केले होते. सध्या सुमीत बडे दूर से आये है या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याची मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. सुमीतची मालिका जरी संपणार असली तरी प्रेक्षकांना आता चिन्मयी एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. चिन्मयीचा छोट्या पडद्यावरचा हा कमबॅक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तिला आशा आहे.