या अभिनेत्रीने MeToo हा हॅशटॅग वापरून सांगितले की, सातव्या वर्षी झाले होते माझे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 12:22 IST
गेल्या काही दिवसांपासून #MeToo हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगचा अर्थ काय असा प्रश्न सध्या सर्वांनाच ...
या अभिनेत्रीने MeToo हा हॅशटॅग वापरून सांगितले की, सातव्या वर्षी झाले होते माझे लैंगिक शोषण
गेल्या काही दिवसांपासून #MeToo हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगचा अर्थ काय असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडत आहे. हा हॅशटॅग वापरून सध्या अनेकजण आपल्या आयष्यातील कटू अनुभवांबद्दल सांगत आहेत. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटी देखील पुढे येऊन आपल्या आयुष्यातील अनुभव मांडत आहेत. हा ट्रेंड हॉलिवूडमधून सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी वीनस्टीन यांचे प्रकरण चांगलेच गाजतंय. हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विषय किती गंभीर आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक महिला आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहे पण याविषयी ते खुलेपणाने बोलू शकत किंवा न्याय मागू शकत नाही. अशा महिलांनी फक्त सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून ट्वीट करावे किंवा फेसबुकवर स्टेटस अपलोड करावे असे आव्हान हॉलिवूड अभिनेत्रींनी केले आहे. त्यांच्या या मोहिमेला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला आहे. भारतातही ट्विटवर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषदेखील मुक्तपणे हा हॅशटॅग वापरून व्यक्त होत आहेत. बॉलिवूडमधील अभिनेत्री तसेच टेलिव्हिजनवरील कलाकार देखील आपल्या आयुष्यातील प्रसंग सोशल मीडियावर लिहित आहेत. कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत झळकलेल्या मल्लिका दुआने देखील आपले लैंगिक शोषण झाले असल्याचा खुलासा केला आहे. मल्लिका दुआने फेसबुकला #MeToo या हॅशटॅगसोबत लिहिले आहे की, मी केवळ सात वर्षांची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते. मी माझ्या आईसोबत बाहेर चालली होती. त्यावेळी आई कार चालवत होती तर तो व्यक्ती माझ्यासोबत मागच्या सीटवर बसला होता. पूर्णवेळ त्याचा हात माझ्या कपड्यांमध्ये (स्कर्टच्या आत) होता. त्यावेळी माझी बहीण देखील माझ्यासोबत होती. मी त्यावेळी केवळ ११ वर्षांची होती. त्याचा एक हात माझ्या स्कर्टमध्ये होता आणि दुसरा हात माझ्या बहिणीच्या पाठीवर. त्यावेळी माझे बाबा माझ्या कारमध्ये नव्हते. पण त्यांना ही गोष्ट कळली, त्यावेळी त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला होता. मल्लिकाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मल्लिकाने ही गोष्ट लोकांसमोर आणली यासाठी अनेकांनी तिचे कौतुक केले आहे तर लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे काहींनी म्हटले आहे. Also Read : उबर कंपनीच्या ड्रायव्हरने या अभिनेत्रीला केली शिवीगाळ