अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. यात ती स्वानंदीची भूमिका साकारतेय तर सुबोध भावे समरची भूमिका निभावतो आहे. सध्या या मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे. लवकरच स्वानंदी आणि समर लग्नगाठ बांधणार आहेत. याच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. दरम्यान आता तेजश्रीने नुकताच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "परिकथा खरोखरच खूप सुंदर असतात." या फोटोमध्ये तेजश्री सुंदर वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केलीय. त्यावर मराठमोळे दागिने, नथ आणि मुंडावळ्या घातल्या आहेत. साडीवर तिने हिरव्या रंगाची शाल घेतली आहे. तिच्या या मोहक वधू लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत आणि फोटोवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हा फोटो मालिकेतील 'स्वानंदी' आणि 'समर' यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याचं म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या सीनचं शूटिंग सुरू असल्याचं सांगत आहे.
वर्कफ्रंट तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिने 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून 'जान्हवी'ची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. याशिवाय, तिने 'अग्गंबाई सासूबाई' आणि 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटसृष्टीतही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'ती सध्या काय करते', 'हॅशटॅग तदेव लग्नम' आणि 'बबलू बॅचलर' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. सध्या ती 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत स्वानंदी ही मुख्य भूमिका साकारत असून तिचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Web Summary : Tejashri Pradhan's bridal look from 'Veen Dogantali Hi Tutena' is captivating fans. As Swanandi prepares to marry Samar, Tejashri shared a photo in a red saree with traditional jewelry, garnering likes and comments. She is known for roles in 'Honar Sun Me Hya Gharchi' and films like 'Ti Saddhya Kay Karte'.
Web Summary : तेजश्री प्रधान का 'वीण दोघांतली ही तुटेना' से दुल्हन लुक प्रशंसकों को लुभा रहा है। जैसे ही स्वानंदी समर से शादी करने की तैयारी कर रही है, तेजश्री ने लाल साड़ी और पारंपरिक गहनों में एक तस्वीर साझा की, जिस पर खूब लाइक्स और कमेंट्स आ रहे हैं। वह 'होणार सून मी ह्या घरची' और 'ती सध्या काय करते' जैसी फिल्मों में अपनी भूमिकाओं के लिए जानी जाती हैं।