Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लाथ घालू का कंबरेत ते ही पाय उचलून...'; जान्हवीची मोठी चूक दाखवत सुरेखा कुडचींनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:13 IST

जान्हवी किल्लेकरने काल घरात टास्क खेळताना अनेकांना खडेबोल सुनावले. त्यावर सुरेखा कुडचींनी बोट ठेऊन तिला चांगलंच फटकारलं आहे

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल पाताळलोक हे कार्य पार पडलं. या कार्यात एकूण तीन फेऱ्या झाल्या. जान्हवी आणि निक्की एकमेकांच्या विरुद्ध टीममधून खेळत होते. दोघींमध्ये तुफान वाद झाले. जान्हवीला या आठवड्यात जेलची शिक्षा मिळाली. तरीही जान्हवीचे निक्की आणि घरातील इतरांशी वाद झाले. काल टास्कमध्येही रागाच्या भरात जान्हवी खूप काही बोलून गेली. जान्हवीची हीच चूक सुरेखा कुडचींनी दाखवून दिली.

सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहितात, " मला तरी अस वाटतंय .... जान्हवीला ज्या कारणासाठी जेल मधे टाकले आहे त्यात तिचा वागण्यात काही फरक जाणवतोय का ?? फरक इतकाच आहे की आधी वर्षा ताई आणि पंढरीनाथ ला बोलायची आता निक्की ला बोलतेय ... बाकी बोलणं तसंच माज तोच बॉडी लँग्वेज तशीच ... आणि इतकी मैत्री की जी निक्की जेव्हा बोलत नव्हती तेव्हा हीच आहे ना ती जिने तिचा उशीवर बदाम (हर्ट) काढून त्यात लव यू निक्की लिहीलं होत मिस यू लिहीला होत ... नंतर गळ्यात गळे घालून पप्या घेतल्या होत्या..."

सुरेखा कुडची पुढे लिहितात, "जान्हवी निक्कीसाठी रडली होती ... इतकी घनिष्ठ मैत्री अचानक itkaaaaa वाईटपणा ... एखादीने माफी मागितली असती ... चुकले म्हणाली असती ... नाही का ???? आजचा एपिसोड नीट पाहा त्यात ती घनश्याम ला म्हणाली आहे की डोक्यावर पडला आहेस का लाथ घालू का कंबरेत ते ही पाय उचलून . • काय म्हणावे आता ..." अशाप्रकारे सुरेखा कुडचींनी जान्हवीची मोठी चूक दाखवून तिला फटकारलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठीटेलिव्हिजनकलर्स मराठी