'चला हवा येऊ द्या' (chala hava yeu dya) हा शो जरी बंद झाला तरी सर्वजण या कार्यक्रमाला नक्कीच मिस करत असतील यात शंका नाही. 'चला हवा येऊ द्या' मधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. यातील सर्वांचे लाडके कलाकार म्हणजे श्रेया बुगडे (shreya bugde) आणि कुशल बद्रिके.(kushal badrike) कुशल-श्रेया या दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय जो चर्चेत आहे. या व्हिडीओत कुशल - श्रेया यांचा मजेशीर संवाद बघायला मिळतोय. विशेष म्हणजे श्रेयाच्या वाढदिवशी कुशलने हा व्हिडीओ शेअर केलाय.
कुशलने शेअर केला श्रेयाचा धमाल व्हिडीओ
एअरपोर्टवर कॉफी पितानाचा कुशल-श्रेयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओखाली कुशल लिहितो, "श्रेया यार तुला भेटल्यावर माझी खात्री पटली की, लग्नाच्या गाठी जशा “स्वर्गात” बांधल्या जातात. तशाच मैत्रीच्या गाठी ह्या “नर्कात” बांधल्या जातात. आपण सोबत असलो तर नरकातल्या शिक्षा सुद्धा आनंदाने भोगू."
"कधी अमुक एक शिक्षेचा अनुभव घ्यायचा असेल तर काय किडे करावे लागतात हे विचारून ती सुद्धा requirement पूर्ण करू पण एकट्याने स्वर्ग गाठायची वेळ आलीच तर… नकोसा होईल तो, स्वर्ग सुद्धा नरक वाटेल ! म्हणून सांगतो “माझ्या सारखं” थोडं-थोडं पुण्य करत जा अधून मधून, बाकी मी स्वर्गात वशिला लावतो तुझा टेन्शन नाय !! आणि हो happy bday." अशाप्रकारे कुशलने हा खास व्हिडीओ शेअर करुन श्रेयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.