Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘या’ कारणामुळे सोडणार ‘गँग्स ऑफ फिल्मीस्तान’ शो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 18:54 IST

‘भाभीजी घर पर हैं’ आणि ‘बिग बॉस’ची विनर असलेली शिल्पा २ वर्षांनंतर आपल्या कमबॅकची तयारी करत होती. ती ‘गँग्स ऑफ  फिल्मीस्तान’ या कॉमेडी शोद्वारे कमबॅक करणार होती. मात्र, आता वेगळीच बातमी हाती येतेय.

भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे ही छोटया पडद्यावर कायम चर्चेत असते. ‘भाभीजी घर पर हैं’ आणि ‘बिग बॉस’ची विनर असलेली शिल्पा २ वर्षांनंतर आपल्या कमबॅकची तयारी करत होती. ती ‘गँग्स ऑफ  फिल्मीस्तान’ या कॉमेडी शोद्वारे कमबॅक करणार होती. मात्र, आता वेगळीच बातमी हाती येतेय. ती म्हणजे, शिल्पा आता हा सोडणार असल्याचे कळतेय. असे काय झाले की, तिला हा शो सोडावा लागतोय? जाणून घ्यायला तुम्हाला आवडेलच. तर वाचा...

अभिनेत्री शिल्पा शिंदे ही बिग बॉसची विजेती झाल्यापासून ती कायम चर्चेत असते. तिने ‘भाभीजी घर पर हैं’ हा शो देखील काही कारणामुळे मध्येच सोडला होता. आता ती ‘गँग्स ऑफ फिल्मीस्तान’ हा कॉमेडी शो सोडण्याच्या तयारीत आहे. याचे कारण तिने निर्मात्यांच्या कामामुळे मी खुश नाही, असे दिले आहे. एका मुलाखतीत शिल्पा सांगते,‘मी केवळ एकाच अटीवर या शोमध्ये काम करेल. ते म्हणजे मी सुनील ग्रोव्हर यांच्यासोबत काम करू इच्छित नाही. निर्मात्यांनी मला खोटे सांगितले, सुनील ग्रोव्हर या शोमध्ये नसतील. मात्र, मला समजले की, ग्रोव्हर या शोचा भाग असणार आहेत. मी निर्मात्यांना विचारले तर त्यांनी मला संपूर्ण कास्टबद्दल सांगितले.’ 

शिल्पा शिंदे पुढे सांगते,‘मला निर्मात्यांनी सांगितले की, सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिकेचा तुमच्या व्यक्तीरेखेशी काहीही संबंध नसेल. तो नंतरच्या शेड्यूलमध्ये आपल्यासोबत काम करेल. मात्र, त्यांनी आम्हाला लगेचच जॉईन केले आहे. जेव्हा सुनील ग्रोव्हर अ‍ॅक्टमध्ये तुमच्या आसपास असतात तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. ते पूर्ण अ‍ॅक्ट टेकओव्हर करून घेतात. त्यामुळे मग मी माझ्या फॅन्सना नाराज करेल. कारण, मुख्य फ्रेममध्ये मी माझ्या चाहत्यांना दिसणारच नाही. त्यामुळे मी हा शो करायचा नाही, असे ठरवले आहे.’

टॅग्स :शिल्पा शिंदेभाभीजी घर पर हैबिग बॉससुनील ग्रोव्हर