Join us  

'चंद्रकांता'च्या भूमिकेसाठी झालीय या अभिनेत्रीची निवड?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 5:15 PM

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षरा आता नव्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. हिना खान लवकरच छोट्या पडद्यावर ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षरा आता नव्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. हिना खान लवकरच छोट्या पडद्यावर 'चंद्रकांता'नवा शो  सुरू होणार आहे.बालाजी टेलिफिल्म चंद्रकांताची निर्मिती करणार असून 'चंद्रकांता'च्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींचा विचार करण्यात आला होता. अखेर हिना खानचा मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळेच हिना खान चंद्रकांता भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे कळतेय. हिना खानच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकते असेही मालिकेच्या टीमला वाटते.य मात्र याविषयी हिना खान मात्र याविषयी बोलण्यास टाळले. योग्य वेळ येईन तेव्हा सगळ्यांनाच चांगली बातमी देणार असल्याचे हिनाने म्हटले आहे. लवकरच या शोची अधिकृकरित्या  घोषणाही करण्यात येणार आहे.हिना खान 2009 पासून  'ये रिश्ता क्या कहलाता है' शोमध्ये अक्षराही मुख्य भूमिका साकारत होती. काही दिवसांपूर्वीच तिने ही मालिका सोडली होती. हिनालाही तिच्या कामात नाविन्य हवे होते. त्यानुसार चंद्रकांताच्या भूमिकेसाठी हिना खाननेही होकार दिल्याचे कळतेय.ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेचे निर्माते राजन शाही यांनाही हिना खानच चंद्रकाताच्या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचे वाटते. हिना खानच्या करिअरसाठी चंद्रकांता ही भूमिका अक्षरा या भूमिकेप्रमाणेच यशस्वी ठरेल असे राजन शाही यांनी सांगितले.1990 साली दूरदर्शनवर  चंद्रकांताही मालिका हिट ठरली होती.या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.  आता पुन्हा एकदा चंद्रकांताची तिच क्रेझ निर्माण करण्यासाठी हिना खान सज्ज झाली आहे. त्यानुसार आता पुन्हा एकदा चंद्रकांता सुरू होणार असली तरीही नवीन ढंगात ही मालिका रसिकांना पाहायला मिळेल.एकेकाळी दुरदर्शनवर हिट ठरलेली मालिका दोन चॅनल्सवर प्रसारित करण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.