Join us

निळा स्विमसूट घालून पूलमध्ये उतरली मराठमोळी अभिनेत्रीचा, बोल्ड अंदाज पाहून नेटकरी झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 12:15 IST

त्यामुळे तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे (Shweta Shinde). आजवर श्वेताने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती केली आहे. लागिरं झालं जी, देवमाणूस या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजल्या. विशेष म्हणजे उत्तम कथानकासह मालिका सादर करणारी श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यावेळी देखील ती तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

टीव्ही जगतात वावर कमी असला तरी श्वेता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील घडामोडी, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच  श्वेताने तिचे बोल्ड फोटो शेअर केलेत ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

श्वेता शिंदे सध्या व्हॅकेशन एन्जॉय करते. इन्स्टाग्रामवर तिने तिचे स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करतानाचे फोटो शेअर केलंत. श्वेताने तीन फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोत तिच्या ज्युस दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत ती पाठमोरी उभी आहे आणि तिसऱ्या फोटो ती पाण्याचा आनंद घेताना दिसतेय. श्वेताचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत. 

सध्या श्वेताची शेतकरी नवरा हवा ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु आहे. या मालिकेचा विषय तिच्या आईने तिला सुचवला आहे.  श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या. 

टॅग्स :श्वेता शिंदे