Join us

छोट्या पडद्यावर अभिनेत्री पल्लवी पाटीलचं पदार्पण,नवीन मालिका रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:36 IST

छोट्या पडद्यावर नवीन मलिका नवा गडी नवं राज्य प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो सादर करण्यात आला आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून तिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर नवीन मलिका नवा गडी नवं राज्य प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो  सादर करण्यात आला आहे. 

या मालिकेद्वारे पल्लवी पाटील पहिल्यांदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पल्लवी पाटील हिचं पात्र गावातून आपल्या आईं वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आलेली मुलगी रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करते. तिच्या बाळाची आई होताना जणू प्रसव वेदना सहन करते आणि सासू हीच आपली आई आहे या विचाराने सासूला आपलंसं करण्याचा चंग बांधते.

 या मालिकेत पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत दिसणार असून, अनिता दाते रमाच्या भूमिकेत व रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.छोट्या पडद्यावरचा हा पहिला प्रवास पल्लवीसाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे आणि आनंदीच पात्र निभवायला ती खूप उत्साहित आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, "मराठी चित्रपटात  खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे या सुंदर मालिकेत काम करण्याची. आनंदी हे पात्र रामाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते आणि सगळे आव्हान स्वीकारते. आनंदीचं पात्र निभवताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांना पण आनंदीच पात्र आवडेल अशी अपेक्षा करते."  

टॅग्स :पल्लवी पाटील