Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दोन महिन्यानंतर हनीमून एन्जॉय करतेय ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 19:26 IST

बिग बॉस सिझन 10 या रिअॅलिटी शोची स्पर्धक आणि भोजपूरी सिनेमा अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मोनालिसाला खरी ओळख बिग ...

बिग बॉस सिझन 10 या रिअॅलिटी शोची स्पर्धक आणि भोजपूरी सिनेमा अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मोनालिसाला खरी ओळख बिग बॉस या शोने मिळवून दिली. या शोमुळेच फक्त भोजपूरी सिनेमापर्यंतच स्थिमित असणारी मोनालिसाला बिग बॉस याच शोने ख-या अर्थाने प्रसिध्दी मिळवून दिली. याच शोमध्ये तिचे बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूतसह ऑनस्क्रीन लग्नही लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसनंतर नच बलिये या डान्स रिअॅलिटी शोमध्येही पती विक्रांतसह मोनालिसा झळकली.'नच बलिये' शोमधून बाहेर पडल्यानंतर मोनालिसा आता पती विक्रांतसह गोव्यात हनीमुन एंन्जॉय करतेय. होय, मोनालिसाचे विक्रांतसह ऑनस्क्रीन लग्न लावण्यात आले होते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही लगेचच नच बलिये या शोच्या तयारीत बिझी झाले त्यामुळे दोघांनाही त्यांच्या हनीमुन साठी खास वेळच मिळाला नव्हता. आता सध्या नच बलियेशो नंतर दोघांकडेही वेळ असल्यामुळे त्यांनी आता त्यांचे हनीमून प्लॅन केले असल्याचे कळतंय. खुद्द मोनालिसानेच तिचे हनीमून एन्जॉय करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले असून शेअर केलेल्या फोटोंमध्ये फोटोंमध्ये मोनालिस खूपच बोल्ड दिसत असून,बिचवर ती पती विक्रांतसह मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. मोनालिसा आणि विक्रांत यांनी 'सईंया तूफानी', 'मेहरारू बिना रतिया कैसे कटी', 'प्रेम लीला' या भोजपुरी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. दोघांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री नेहमीच हिट राहिली.विक्रांतपूर्वी मोनालिसा मदन नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इनमध्ये होती. सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या लव्ह स्टोरीचा द एंड झाला होता.मदनसोबतच मोनालिसा कोलकाताहून मुंबईत आली होती. येथे आल्यानंतर तिने काही बी-ग्रेड सिनेमांमध्ये अभिनय केला आणि नंतर भोजपुरी सिनेमांकडे ती वळली.