Join us

'या' अभिनेत्रीकडे एकेकाळी दोन वेळेच्या जेवण्यासाठी नव्हेत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 14:38 IST

अभिनेता- अभिनेत्रीचे आयुष्य वाटते तेवढे ग्लॅमरस नसते. प्रत्येकाला यशाच्या शिखरावर पोहोण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. बिदाई फेम अभिनेत्री पारुल ...

अभिनेता- अभिनेत्रीचे आयुष्य वाटते तेवढे ग्लॅमरस नसते. प्रत्येकाला यशाच्या शिखरावर पोहोण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. बिदाई फेम अभिनेत्री पारुल चौहानचे आयुष्य ही असेच संघर्षमय आहे. आज भलेही ती छोट्या पडद्यावरील फेमस चेहरा आहे. आज तिच्याकडे पैसा, प्रसिद्धी आणि नाव असेल तरी एककाळ असा होता की सावळ्या रंगामुळे तिला कुठे काम मिळत नव्हते. पैशाची चणचण असल्यामुळे ती फक्त एकवेळेच्या जेवणावरच भागवायची.      पारुलचा रंग सावळा असल्यामुळे लोक तिला काम द्यायला नकार द्यायचे. मात्र तिने कधी कोणासमोर हात पसारले नाहीत किंवा परिस्थितीसमोर हतबल ही झाली नाही. तिने आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि अखेच तिच्या परिश्रमांना यश आले. त्यानंतर मात्र पारुलने कधीच मागे वळून बघितले नाही. पारुलच्या कुटुंबाची अर्थिक स्थिती ठिक नव्हती. तरीही तिने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघितले. हॉस्टेलमध्ये असताना पैसे नसल्यामुळे ती एका वेळेच जेवण मागवायची आणि त्यातल्या दोन पोळ्या दुपारी खाऊन दोन रात्रीसाठी वाचवून ठेवायची. चार महिन्यानंतर पारुलला एक छोटाशी भूमिका करण्याची संधी मिळाली. ऑडिशनच्या दरम्यान जजस तिचा अभिनय बघून खूप इप्रेस झाले होते. तू खूप पुढपर्यंत जाशील असे त्याचवेळी त्यांनी तिला सांगितले होते आणि हे भाकित तिने खरे देखील ठरवले. पारुलने बिदाई मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेमुळे ती प्रकाश झोतात आली. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिवसांदिवस ती यशाची शिखर चढतच गेली. शाहरुख खानच्या जब हेरी मेट सेजलच्या निमित्ताने त्याला पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा जब हेरी मेट सेजलच्या प्रमोशनसाठी ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’च्या सेटवर आले होते. याआधी शाहरुख बिदाई मालिकेच्या सेटवर छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो क्या आप पाँचवी पास से तेझ है? च्या प्रमोशनसाठी आला होता. त्यादरम्यान पारुलची त्याची ओळख खाली होती.