Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आनंदी' मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार निंबाळकरांच्या बहिणीची भूमिका, मालिकेत येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:54 IST

युगंधर अन् आनंदीच्या आयुष्यात वादळ येणार; शिल्पा निंबाळकरच्या भूमिकेतून 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो पाहिलात?

Aanandi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यापैकीच एक मालिका म्हणजे आनंदी. या मालिकेत अभिनेत्री जाई खांडेकर आणि समीर धर्माधिकारी, अरुण नलावडे  तसेच विकास पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सध्या मालिकेत आनंदी आणि युगंधर निंबाळकरांच्या लग्नाचा सीक्वेंस दाखवण्यात आला. निंबाळकरांचे धाकटे चिरंजीव विद्याधरचा आनंदीला मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जातो. इतकंच नव्हेतर तिचं लग्न मोडण्यासाठी तो आनंदीचं अपहरण करतो आणि नको तसे तिच्या चारित्र्यावर आरोप  करतो. या सगळ्या प्रकारामुळे आनंदीचं लग्न मोडतं त्यामुळे युगंधर निंबाळकर आनंदीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतात.


आनंदीने लग्नानंतर निंबाळकरांच्या घरात प्रवेश केलाय मात्र, आता तिच्यासमोर युगंधर निंबाळकरांची बहीण म्हणजेच शिल्पा निंबाळकर नावाचं आव्हान उभं ठाकलं आहे.दरम्यान,  निंबाळकरांचे कुटुंबिय आनंदीचा सून म्हणवून घेण्यास नकार देतात.  मालिकेत निंबाळकरांच्या बहिणीच्या भूमिकेत प्रेक्षकांना नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. हे पात्र अभिनेत्री मुग्धा शाह साकारत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता अभिनेत्रीच्या एन्ट्रीने मालिकेत घडणार? तसेच शिल्पा निंबाळकरांच्या पात्रामुळे काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress enters 'Aanandi' series as Nimbalkar's sister, bringing twist.

Web Summary : Actress Mugdha Shah enters 'Aanandi' as Shilpa Nimbalkar, Yugandhar's sister. Anandi marries into the Nimbalkar family but faces rejection. Her challenge is now Yugandhar's sister. What twist will she bring?
टॅग्स :समीर धर्माधिकारीटेलिव्हिजनसेलिब्रिटी