Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल दुसानीसचं पुन्हा मालिकेत कमबॅक? सेटवरील फोटो व्हायरल, चाहत्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:37 IST

अखेर मृणाल दुसानीस पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (mrunal dusanis)

अभिनेत्री मृणाल दुसानीस ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मृणालला आपण आजवर विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. मृणालचं फॅन फॉलोईंग खूप आहे. मृणालचे फॅन्स तिच्यावर इतकं प्रेम करतात की जेव्हा मृणाल कुटुंबासाठी परदेशी गेलेली तेव्हा तिच्या सोशल मीडियावर तू परत कधी येणार, असं चाहते तिला विचारत होते. आता मृणालच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. मृणाल लवकरच टीव्ही मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.

मृणालचा सेटवरील फोटो व्हायरल

मराठी सीरियल्स या इन्स्टाग्राम पेजने एक फोटो शेअर केलाय. या फोटोत मृणाल दिसत आहे. मृणालने पारंपरिक ड्रेस परिधान केला असून मालिकेसाठी खास तयार झालीय. मृणालसोबत एक व्यक्ती दिसत आहे. त्याने मृणालसोबतचा फोटो पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "अँड वी आर बॅक ऑन सेट्स विथ मृणाल दुसानिस!" आता मृणाल नेमकी कोणत्या मालिकेत झळकणार? ही कोणती नवी मालिका आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यात आहेत.

मृणाल ४ वर्षांनी पुन्हा आली भारतात

मराठी मालिकांमधील लाडका चेहरा आणि कलाविश्वातील हरहुन्नरी गुणी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृणालने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. गेल्या काही वर्षांपासून मृणाल सिनेसृष्टीपासून लांब होती. काही काळ तिने कामातून ब्रेक घेतला होता. पती आणि कुटुंबीयांबरोबर ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. चार वर्षांनी मृणाल पुन्हा भारतात परतली आहे. ती शेवटी आपल्याला 'हे मन बावरे' मालिकेत दिसली.

 

टॅग्स :मृणाल दुसानीसमराठीहे मन बावरेहे मन बावरेअमेरिका