Join us

अभिनेत्री मंदना करिमीला पोल डान्स पडला महागात, डान्स करताना झाली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:15 IST

मंदना करिमी 'बिग बॉसच्या 9' व्या सिझनमध्ये झळकली होती.

मंदना करिमी 'झी 5' 'द कसीनो' वेबसिरिजमध्ये रेहानाची भूमिका साकारते आहे. ज्यात तिचे डोळे सिंहासनावर टिकून असतात. तिने ट्रेलरमधील सर्वात आवडत्या दृश्यांपैकी एक असलेल्या पोल डान्ससंदर्भात एक अनुभव शेअर केला आहे. त्याच सिरीजसाठी पोल डान्स करताना मंदाना जखमी झाली आहे.

बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार मंदनाने सांगितले, मी पोल डान्सच्या सीनसाठी काही दिवस सराव केला आहे. मी एक प्रोफेशनल पोल डान्सरसारखे नाही मॅनेज करु शकले पण मी माझे बेस्ट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. सराव दरम्यान, माझ्या शरिरावर अनेक ठिकाणी लागले. शूटिंग दरम्यान मेकअपच्या मदतीने त्या जखमाने कव्हर करण्यात आले कारण त्यादिवशी मला काहीही करुन परफॉर्म करायचे होते आणि मला वाटते ते खूप चांगले झाले. या सीनने मंदानाने नक्कीच प्रत्येकाचं मनं जिंकले आहे. सिंहासनावर कोण राज्य करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील  उत्सुक आहेत. 12 जूनला ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मंदना करिमी 'बिग बॉसच्या 9' व्या सिझनमध्ये झळकली होती. ‘क्या कुल है हम 3’ सिनेमामधून मंदनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. तसेच तिला बॉलीवूडमध्ये पाहिजे तशा खास संधीही मिळाल्या नाहीत. तुर्तास तिचे बोल्ड फोटो आणि व्हीडीओ पाहून सोशल मीडियावर पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशाच कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :बिग बॉस