Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशमुखांच्या कुटुंबात येणार वादळ! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत 'या' नायिकेची एन्ट्री, कथानकात येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:09 IST

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?

Television: स्टार प्रवाह वाहिनीवरील ' लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील जीवा नंदिनी आणि पार्थ-काव्याची जोडी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.सध्या मालिकेत नंदिनी आणि काव्य गरोदर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे देशमुखांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे.मात्र, त्यांचा हा आनंद वसु आत्याला काही बघवत नाही. काव्या आणि नंदिनीला त्रास देण्यासाठी वसू आत्या सतत काही ना काही प्लॅन करत असते. त्यात आता मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

काव्या आणि पार्थच्या नात्यात सगळं काही सुरळित असताना वसु आत्या त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आणण्याच्या तयारीत आहे. यानिमित्ताने मालिकेत एक लोकप्रिय अभिनेत्री एन्ट्री घेणार आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम 'या मालिकेत मृणाल दुसानिसनं नंदिनीची भूमिका साकारली असून विवेक सांगळेनं जीवाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर विजय आंदळकरने पार्थची तर ज्ञानदानं काव्याची भूमिका साकारली आहे. त्यात आता या मल्टिस्टारर मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून क्षमा देशपांडे आहे.

अभिनेत्री क्षमा देशपांडेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम'या मालिकेत ती दिव्या नावाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दिव्या पार्थच्या ऑफिसमध्ये नोकरी करणार आहे. त्यामुळे दिव्याच्या एन्ट्रीमुळे पार्थर-काव्याच्या नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

वर्कफ्रंट 

अभिनेत्री क्षमा देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाहच्या 'उदे गं अंबे उदे' मालिकेत देखील ती झळकली आहे. यशिवाय 'इंद्रायणी' मालिकेत देखील तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली.

English
हिंदी सारांश
Web Title : Trouble brews in Deshmukh family! New entry in 'Lagnalanantr Hoilch Prem'.

Web Summary : Popular TV show 'Lagnalanantr Hoilch Prem' sees a twist with Kshama Deshpande's entry as Divya. As Nandini and Kavya are pregnant, Vasu Atya plots trouble. Divya's role in Parth's office may impact Parth-Kavya's relationship.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया