Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारों में मेरी बहना! अभिनेत्री खुशबूनं दिलं बहीण तितिक्षा तावडेला असं क्युट सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 14:07 IST

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत.

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपले स्थान निर्माण करत आहेत.  यापैकीच एक जोडी आहे खुशबू आणि तितिक्षा तावडेची. सोशल मीडियावर दोघी नेहमीच एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. नुकतेच खुशबूने तितिक्षाला एक छान सरप्राईज दिलं आहे. 

"सारं काही तिच्यासाठी" मालिकेचा पहिल्या प्रोमोपासूनच ह्या मालिकेची चर्चा होताना दिसतेय कारण आहे तगडी कलाकारांची फौज आणि ह्या मालिकेचं संगीत.  ही कथा आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. मैलोनमैल लांब असून सुद्धा त्याची नाळ एकमेकींशी जोडली आहे.

'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेच्या प्रोमोशनच्या निमित्ताने खुशबू तावडे हिने सांगलीत हजेरी लावली.  तर दुसरीकडे खुशबूची लहान बहीण तितिक्षा तावडे तीही  सांगलीत 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ह्या मालिकेच्या प्रोमोशनसाठी आलेली होती. वाहिनीच्या एकाच कार्यक्रमात दोघी सख्ख्या बहिणी समोरासमोर आल्या. खुशबूने तितिक्षाला एक प्रकारे गोड सर्प्राइझच दिले आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला.

 

टॅग्स :तितिक्षा तावडेझी मराठी