Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीच्या ‘योगा’वर नेटकरी फिदा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 10:28 IST

या अभिनेत्रीचा ‘योगा’ सध्या जाम चर्चेत आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी कविताने  रोनित बिस्वाससोबत लग्न केले.

टीव्ही शो ‘एफआयआर’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता कौशिक हिचा ‘योगा’ सध्या जाम चर्चेत आहे. होय, कठीण योगासने करतानाचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  सोशल मीडियावर कविता कौशिक हिच्या फोटोखाली आलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता  चाहते तिच्यावर चांगलेच फिदा असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर मिळणारा हा प्रतिसाद पाहून कविताने योगमुद्रेतील अनेक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर चाहते भलतेच खूश आहेत.

‘एफआयआर’मध्ये तिने चंद्रमुखी चौटाला या दबंग महिला पोलीस अधिका-याची भूमिका साकारली होती. तेव्हापासून चंद्र्रमुखी चौटाला  म्हणूनही कविता कौशिक ओळखली जाते.

 अलिकडे कविता कौशिक ही अभिनयात फारशी सक्रिय दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असलेली पाहायला मिळते. इन्स्टाग्रामवर कविता कौशिक हिचे सुमारे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ती कधी आपल्या बोल्ड अदाजांनी चाहत्यांना घायाळ करु पाहते. तर, कधी आपल्या हटके योगा पोजमुळे. इन्स्टाग्रामवर कविताच्या विविध रुपाचे दर्शन होते.  तिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात.  

दोन वर्षांपूर्वी कविताने  रोनित बिस्वाससोबत लग्न केले. रोनितसोबत लग्न करण्याआधी कविता अभिनेता नवाब शहा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी संगनमताने आपल्या नात्याला पूर्णविराम दिला होता.

खरे तर कविता आणि नवाब यांना लग्न करायचे होते. पण कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला होता. त्या दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने कविताच्या पालकांनी लग्नाला नकार दिला असल्याची चर्चा होती. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करायचे नसल्याने तिने ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान रोनित तिच्या आयुष्यात आला आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

टॅग्स :कविता कौशिक