Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री काजल काटेनं खरेदी केलं आलिशान घर, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:48 IST

Kajal Kate : काजल काटे हिने नुकतेच स्वत:चे घर खरेदी केले आहे. या नवीन घरात तिने नवऱ्यासह वास्तूशांतीची पूजाही केली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath). या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील पात्र आजही रसिकांच्या मनात घर करुन कायम आहे. या मालिकेतील शेफालीच्या भूमिकेतून अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) घराघरात पोहचली. या मालिकेनंतर सध्या ती मुरांबा मालिकेत काम करताना दिसते आहे. दरम्यान काजल काटे हिने नुकतेच आलिशान घर विकत घेतले आहे आणि ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

काजल काटे हिने नुकतेच स्वत:चे घर खरेदी केले आहे. या नवीन घरात तिने नवऱ्यासह वास्तूशांतीची पूजाही केली आहे. काजल काटे हिने इन्स्टाग्रामवर नवीन घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळत आहे. तिने नवीन घराचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, घर…सुख कळले…प्रतिक काजल करुणा. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सुख कळले हे गाणंही वापरले आहे. काजलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर तिची सहकलाकार आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले की, अभिनंदन…तुला प्रेम आणि सुख मिळो.

काजल काटेच्या नवऱ्याचं नाव प्रतिक कदम असून तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये प्रतिक कदम प्रशिक्षक म्हणून काम पाहतो. काजल काटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या मुरांबा मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे.