Join us

मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकरने शेअर केला सगळ्यात ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:20 IST

ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन देखील चर्चेत असते.

ईशा केसकरला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  या माध्यमातून तीआपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असते. ईशाने अलिकडेच तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोतील ईशाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. ईशाच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन देखील चर्चेत असते.  गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत.चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते.

काहे दिया परदेस या मालिकेत ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. लवकरच तो रिंकु राजगुरु, प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशीसोबत 'छुमंतर' सिनेमात दिसणार आहे. ईशाबाबत बोलायचे झाले तर ती  शेवटची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिसली होती.  

टॅग्स :ईशा केसकर