Join us

​ही अभिनेत्री अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी घरातल्यांशी खोटं बोलून आली होती मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 15:34 IST

रतन रजपूतने राधा की बेटीयाँ कुछ कर दिखाऐगी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना ...

रतन रजपूतने राधा की बेटीयाँ कुछ कर दिखाऐगी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर तिला अगले जन्म मोहे बिटियाँ ही किजो या मालिकेत लालीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यानंतर तिने महाभारत, संतोषी माँ यासांरख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली आहे. रतनने आज छोट्या पडद्यावर तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. या क्षेत्रात तिचे कोणीही गॉडफादर नव्हते. पण तरीही तिने तिच्या मेहनतीच्या बळावर आज यश मिळवले आहे. रतनचे वडील हे सरकारी नोकरीत असल्याने रतनचे बालपण विविध शहरांमध्ये गेले आहे. रतनला लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात तिचे नाम कमवायचे होते. पण या क्षेत्रात तिच्या ओळखीचे कोणीच नव्हते. तिचे गुरू सुरेंद्र शर्मा यांनी तिला मुंबईत जाण्याचे सुचवले होते. पण अभिनय क्षेत्रात करियर कऱण्यासाठी कुटुंबातील लोक मुंबईला जायला देणार नाहीत याची रतनला कल्पना होती. त्यामुळे रतनने मी ट्रीपसाठी मुंबईला जातेय असे घरी सांगितले आणि ती मुंबईत आली. ही २००८ची घटना आहे. मुंबईत आल्यावर लगेचच तिला राधा की बेटीयाँ कुछ कर दिखाऐगी या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत काम करते असे तिने घरातल्यांना सांगितलेच नाही. मुंबईत नोकरी मिळाली असल्याने मी काही महिने तरी मुंबईतच राहील असे तिने तिच्या कुटुंबियांना सांगितले. पण ती मालिकेत काम करत असल्याचे काहीच दिवसांत तिच्या घरातल्यांना कळले. त्यावेळी त्यांना प्रचंड दुःख झाले होते. पण रतनाच्या पहिल्याच मालिकेतील तिची रुची ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली आणि त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी देखील सगळे विसरून या क्षेत्रात करियर करण्यासाठी तिला पाठिंबा दिला.