Join us
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या बिझनेसमनसह ही अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पाहा लग्नाचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:50 IST

मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.नुकतेच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कॉमेडीयन भारती सिंग हर्ष ...

मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.नुकतेच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कॉमेडीयन भारती सिंग हर्ष लिंबाचियासह लग्नबंधनात अडकली आता.तिच्या पाठोपाठ टीव्ही अभिनेत्री सुहानी धानकी बॉयफ्रेंड प्रथमेश मोदीसोबत रेशीमगाठीत अडकली आहे.सुहानीने लग्नाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आपली ही खुश खबर चाहत्यांसह शेअर केली आहे.प्रथमेश मोदी हा लंडनमध्ये बिझनेसमॅन आहे.गेल्या वर्षीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.या लग्नसोहळ्याला सुहानी आणि प्रथमेशचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.या फोटोंमध्ये नववधू सुहानीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावर सुहानीच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.सुहानी धानकी सध्या नवीन मालिका 'पोरस'मध्ये प्रिन्सेस लाचीची भूमिकेत झळकत आहे.लग्नापूर्वी सुहानीची मेंदी आणि संगीत सेरेमनी झाली. मेहंदी सेरेमनीत सुहानीने पर्पल कलरचा लहेंगा तर संगीत सेरेमनीत स्काय ब्लू आणि गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन असलेला डिझायनर ड्रेस घातला होता.Also Read:आदित्य रेडजीने पोरस या मालिकेसाठी केले मुंडन'पोरस' राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेत लक्ष लालवाणी, सुहानी धानकी, रती पांडे, आदित्य रेडजी, प्रणित भट्ट यांसारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष या मालिकेत पोरसची प्रमुख भूमिका साकारत आहे. 'पोरस' या मालिकेचे बजेट हे जवळजवळ ५०० कोटींच्या घरात असून ही मालिका अतिशय भव्य आहे. पोरस या मालिकेची कथा ख्रिस्तपूर्व ३२६ च्या काळातील आहे. त्यामुळे प्राचीन काळातील वैभव उभे करण्यासाठी आणि तो काळ जिवंत करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीकडे देखील बारकाईने लक्ष दिले जात आहे.