Join us

"मी मालिकाविश्वातून रिटायरमेंटच घेतलीये", गार्गी फुलेंचा खुलासा; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:11 IST

यामागचं नेमकं कारण काय वाचा.

मराठीतील दिग्गज अभिनेते निळू फुले यांची लेक गार्गी फुले (Gargi Phule)  मालिकाविश्वात सक्रीय आहे. 'तुला पाहते रे' मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आपल्या गोड अभिनयाने तिने सर्वांनाच आपलंसं केलं होतं. मात्र आता गार्गीने मालिका न करण्याचं ठरवलं आहे. आपण मालिकाविश्वातून रिटायरमेंटच घेतलीये असा खुलासा केला आहे. यामागचं नेमकं कारण काय वाचा.

लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाली, "खरं सांगायचं तर मी मालिकाविश्वातून रिटायरमेंटच घेतली आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. १० वर्ष मी मालिकाविश्वात काम केलं त्यामुळे मी कुटुंबापासून लांब राहिले. तसंच कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूप विचित्र झालं आहे. पॅशन एके पॅशन असेल तरच मराठी मालिकांमध्ये काम करावं. नाहीतर आरोग्याच्या आणि इतर समस्या होतात."

चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस यांचा झगडा आहेच. अनेकदा लेखकांकडे एपिसोडही तयार नसतात. कधी अचानक सुट्टी मिळते आणि नंतर अचानक दिवस रात्र शूट असतं. तिथे शिस्त लागणं खूप गरजेचं आहे. पण निर्मातेही हतबल आहेत. चॅनललाही कळत नाही की नक्की कोणता ट्रॅक चालेल काय नाही चालणार. त्यामुळे सगळीच अनियमितता आहे. कोरोनानंतर हे खूप झालं आहे. प्रेक्षकांना आवडत नसेल तर चॅनल, निर्माते सगळेच पॅनिक होतात. पॅशन हा एकमेव धागा मराठी मालिकेत काम करायला जो़डून ठेवतो. पण जर आनंदच मिळत नसेल तर काय उपयोग. छान छान भूमिका करण्याची इच्छा तर खूप आहे पण त्यामागची धावपळ पाहून आता थांबावं वाटतं."

टॅग्स :गार्गी फुलेमराठी अभिनेताटेलिव्हिजन