Join us  

लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्रीला गवसला तिचा पार्टनर, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 2:38 PM

. बऱ्याचदा दिक्षाला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते.

21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान सेलिब्रेटी लॉकडाऊनमध्ये  वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. तसेच शूटिंग बंद असल्यामुळे इतरांप्रमाणे अभिनेत्री दीक्षा जोशी देखील कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. इतकेच नाही तर तिला लॉकडाऊनमुळे बऱ्याच गोष्टी शिकण्याची संधी लाभली असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिक्षा आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते. बऱ्याचदा दिक्षाला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते. 

नुकतंच सोशल मीडियावरील एका पोस्टमधून दिक्षाने तिच्या रिलेशनशिप स्टेट्सचा गंमतीशीरपणे उलगडा केला आहे. तिने डॉगीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या डॉगी सोबत खेळताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, माझा डॉगी हा केवळ माझा क्वॉरंटाईन पार्टनरच नाही तर माझा आयुष्यभराचा सोबती आहे. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. या फोटोवरून तिला प्राण्यांची फार आवड असल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्या डॉगीवर तिचे जीवापाड प्रेम आहे.

तुर्तास तिने इतरांनाही वेगवेगळ्या गोष्टी करत बिझी कसे राहात येईल यावरही सांगितले आहे. दीक्षाने सांगितले की,तुम्ही टीव्ही पाहू शकता, इंटरनेटवर काम करू शकता, पुस्तके वाचू शकता, हे आतील लढाईसाठी खूप गरजेचे आहे. बाहेरची लढाई तुम्ही कितीही लढा, परंतु खरी लढाई तर आतली आहे. जर ती तुमच्यावर हावी झाली तर तुम्ही सहन करू शकत नाही. असामान्य परिस्थितीत तुम्ही कसे सामान्य राहता, त्याची ही परीक्षा आहे, ही संयमाची परीक्षा आहे. आपली अशी अवस्था झाली आहे की, बाहेरचे वातावरण आणि लोकांचा आमच्यावर इतका परिणाम झाला आहे की, आम्ही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो.

 

ही लॉकडाऊनची वेळ आम्हाला स्वत:वर थोडा विश्वास करायला शिकवते. एकटे राहण्यात आनंद शोधा. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व गोष्टी सुरू होतील, परंतु माणसाला स्वत:ची सोबत करता यायला पाहिजे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस