Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेला पितृशोक, ६८व्या वर्षी अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 18:51 IST

'पवित्रा रिश्ता' फेम अंकिता लोखडेंच्या वडिलांचं निधन, ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचं शनिवारी(१२ ऑगस्ट) निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पितृशोकामुळे अंकितावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाने अंकिताच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. शशिकांत लोखंडे यांचं निधनामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून रविवारी(१३ ऑगस्ट) त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अंकिताचं तिच्या वडिलांबरोबर जवळचं नातं होतं. अनेकदा ती सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायची. अंकिताने फादर्स डे निमित्ताने वडिलांबरोबरच खास व्हिडिओही तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. अंकिताचे वडील पेशाने बँकर होते.

‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. या मालिकेतील अर्चना या पात्राने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मालिकांबरोबरच अंकिता चित्रपटांतही झळकली. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटांत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अंकिताने २०२१मध्ये विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

टॅग्स :अंकिता लोखंडेमराठी अभिनेता