Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री अमृता खानविलकरनं छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:24 IST

Amruta Khanvilkar : मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमातील चिमुकल्या श्रीमयी सुर्यवंशीच्या परफॉर्मन्सचे अमृताने कौतुक केले.

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मंचावरील चिमुकल्यांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नुकतेच या मंचावर चिमुकल्या श्रीमयी सुर्यवंशीने चंद्रा चित्रपटातील बाई गं या गाण्यावर परफॉर्म केले. ८ वर्षांच्या श्रीमयीचा हा परफॉर्मन्स पाहून चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या नृत्याच्या प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावर श्रीमयीच्या गाण्याची झलक शेअर करत तिने श्रीमयीला शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रीमयीला शुभेच्छा देताना अमृता खानविलकर म्हणाली, चंद्रमुखी चित्रपटातील दोन अविस्मरणीय गाणी चंद्रा आणि बाई गं खूप लोकप्रिय झाली. अनेक फॅन्स, अनेक छोट्या मुली या गाण्यावर नृत्य करताना दिसल्या आणि अजूनही दिसतात. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमामध्ये ८ वर्षांच्या श्रीमयीने माझ्या अत्यंत प्रिय गाण्यावर हा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स केला.

अमृता पुढे म्हणाली की, खरे सांगू तर अशा चिमुकल्यांना जेव्हा लावणी अश्या प्रकारे सादर करताना बघते तेव्हा प्रचंड आनंद होतो. या गोड चंद्राला आभाळभर शुभेच्छा... खूप मोठी हो’ अशा शब्दात अमृताने श्रीमयीचे कौतुक केले आहे. नवा कार्यक्रम मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

टॅग्स :अमृता खानविलकर