Join us

ऐश्वर्या नारकरच्या फिटनेसचं रहस्य झालं उघड; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:11 IST

वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य अबाधित आहे. विशेष म्हणजे त्यांचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

उत्तम अभिनयासह सौंदर्याची जोड असलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य अबाधित आहे. विशेष म्हणजे त्यांचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. त्यामुळे त्यांची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा होते. इतकंच नाही तर त्यांच्या फिटनेसचं किंवा ग्लोइंग स्कीनमागील रहस्य काय हे जाणून घेण्याचाही अनेक जण प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांनी आता त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असेलल्या ऐश्वर्या नारकर कायम नेटकऱ्यांना त्यांच्याविषयीचे अपडेट्स देत असतात. त्यामुळे त्या अनेकदा त्यांचे काही पर्सनल व्हिडीओ, फोटो शेअर करत असतात. यात त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कठीण वर्कआऊट करताना दिसते आहेत. त्यांनी वर्कआऊटच्या माध्यमातून फिटनेस जपल्याचं दिसून येत आहे.

ऐश्वर्या नारकर लोकप्रिय अभिनेत्री असून त्या कायम त्यांच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असतात. वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिटमध्ये त्या वरचेवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.

टॅग्स :ऐश्वर्या नारकर