Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणादासोबत 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 15:22 IST

आता राणादा म्हणजेच हार्दीक जोशी लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादाच्या भूमिकेतून अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहचला. आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता राणादा म्हणजेच हार्दीक जोशी लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत आई कुठे काय करते मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर दिसणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि नुकतेच तिने इंस्टाग्रामवर हार्दीक जोशीसोबतचा फोटो शेअर करत आगामी प्रोजेक्टची माहिती दिले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, काहीतरी नवीन लवकरच येणार आहे. या फोटोत त्या दोघांच्या हातात क्लॅप दिसत असून त्यावर मुहूर्त आणि डाव असे लिहिलेले दिसत आहे.

डाव चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी दोघे खूपच उत्सुक आहेत. त्या दोघांचे चाहते या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.   

हार्दिक जोशीने 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणाची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे.

अभिनेत्री राधा सागर सध्या आई कुठे काय करते या मालिकेत पहायला मिळते आहे. तसेच ती मलाल या हिंदी आणि नाती खेळ या मराठी चित्रपटात झळकली आहे. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाआई कुठे काय करते मालिकाहार्दिक जोशी