Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न

By देवेंद्र जाधव | Updated: May 29, 2025 21:15 IST

अखेर पाच दिवसांनी सुदेश म्हशिलकर यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर मौन सोडलंय. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटिंगचे सविस्तर स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. त्यामुळे प्राची पिसाटची वेगळी बाजू सर्वांसमोर आली आहे

प्राची पिसाटने (prachi pisat) अभिनेते सुदेश म्हशिलकर यांचे स्क्रीनशॉट व्हायरल केले. त्यामुळे सुदेश म्हशिलकर (sudesh mhashilkar) यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलंं. पण नुकतंच सुदेश यांनीच सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर सर्वांना दाखवला आहे. याशिवाय भाईंदर पोलीस ठाण्यात फेसबुक अकाउंट हॅक झालंय त्याविषयी तक्रार दाखल केली आहे. काय म्हणाले सुदेश म्हशिलकर सविस्तर घ्या जाणून.

सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीसोबत झालेला चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. याशिवाय भाईंदर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची लेखी प्रत त्यांनी सर्वांना दाखवली आहे. सुदेश म्हणतात, "खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.”1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही.त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे — ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं 🤣🤣🤣🤣 असं दिसेल.जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येता

टॅग्स :टेलिव्हिजनमराठी अभिनेता