Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली हो ! ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम समीर परांजपेच्या घरी चिमुकलीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 16:03 IST

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमुळे समीर घराघरात पोहोचला.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारणारा अभिनेता समीर परांजपेला मुलगी झाली आहे. समीरच्या पत्नीने ही गुडन्यूज इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर अनुजाने समीरसोबतचे बेबी बम्पचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमुळे समीर घराघरात पोहोचला. 

27 नोव्हेंबर 2016 रोजी समीर व अनुजा लग्नबेडीत अडकले.अनुजा ही समीरची मैत्रिण होती. मैत्री प्रेमात बदलली.  समीर अभिनेता असला तरी अनुजाचा अभिनयाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. ती पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.

नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक आवड असल्याने समीर हळूहळू कला जगताकडे वळला. हा प्रवास समीरसाठी नक्कीच सोपा नव्हता. इंजिनिअरिंग करण्यासाठी समीरने पुणो गाठले. इंजिनिअरची पदवी पूर्णही केली. मात्न, कलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अगदी सुरुवातीला समीरला राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता. ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली. भातुकली या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या क्लास ऑफ 83 मध्ये तो दिसला होता. 

टॅग्स :कलर्स मराठी