Join us  

या कारणामुळे 'बिग बॉस'च्या घरातून अभिनेता राहुल देवची झाली एक्झिट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 12:11 PM

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोणाची एक्झिट होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राहुल देव, मनवीर गुर्जर, नितीभा कौल, ...

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोणाची एक्झिट होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राहुल देव, मनवीर गुर्जर, नितीभा कौल, बानी, लोपमुद्रा राऊत यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अभिनेता राहुल देवची एक्झिट होणार आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातील सदस्य विशेषतः सेलिब्रिटी घरातल्या टास्कमध्ये म्हणावा तसा सहभाग घेत नसल्याचे आढळलं होते. यानंतर शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खाननं या सगळ्यांची शाळा घेत चांगलेच सुनावले होते. मनोरंजन करु न शकणारे , झोपणारे आणि आळशी सेलिब्रिटी पाहून रसिक वैतागले असल्याची आठवण सलमानने सेलिब्रिटींना करुन दिली होती. यांत राहुल देवपासून घरातील इतर सेलिब्रिटींचाही समावेश होता. यानंतर बिग बॉसच्या घरातील झोपी गेलेले सेलिब्रिटी जागे झाले आणि त्यांनी घरातल्या टास्कमध्ये उत्साहाने सहभाग घेण्यास सुरुवात केली. घरातील आपली वागणूकही बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र अभिनेता राहुल देव मात्र आपला आळस दूर करु शकला नाही. त्यामुळेच की काय रसिकांनीच त्याला व्होटिंगच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोललं जात आहे. तसेच आळशी आणि रटाळ सेलिब्रिटींमुळे टीआरपीवर परिणाम होऊ नये यासाठीच शोच्या निर्मात्यांनीच राहुलला घराबाहेर काढले नाही ना?