Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:30 IST

प्रसिद्ध अभिनेत्यावर त्याच्या गर्लफ्रेंडने गंभीर आरोप केल्याने अभिनेत्याला पोलिस सेटवरुनच चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. कोण आहे हा अभिनेता?

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे 'अनुपमा'. ही मालिका TRP मध्ये कायम टॉपला असते. या मालिकेतील कलाकारही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अशातच 'अनुपमा' मालिकेच्या सेटवरुन धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. ती म्हणजे या मालिकेत राजा ही भूमिका साकारणारा अभिनेता जतिन सूरीला (jatin suri) पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. जतिनला 'अनुपमा' मालिकेच्या सेटवरुनच पोलिसांनी चौकशीसाठी नेलं. जतिनविरुद्ध त्याच्या गर्लफ्रेंडने आरोप केल्याने पोलिसांनी हे पाऊल उचललं.

जतिनला अटक, नेमकं प्रकरण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, जतिनची गर्लफ्रेंड शूटिंग लोकेशनवर येऊन तिने अभिनेत्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. पुढे गर्लफ्रेंडने पोलिसात धाव घेतल्यावर हे प्रकरण आणखी वाढलं. त्यामुळे पोलिसांना सेटवर यावं लागलं. त्यानंतर जतिन आणि त्याची गर्लफ्रेंड दोघांनाही पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. जतिनवर कोणती कायदेशीर कारवाई झालीय का, याविषयी अद्याप माहिती समोर आली नाहीये. 

या घटनेविषयी अभिनेता जतिनने कोणतंही वक्तव्य केलं नाहीये. सध्या या प्रकरणावर मी काही बोलू इच्छित नाही, असं त्याने सांगितलं आहे. याशिवाय 'अनुपमा' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने आणि निर्मात्यांनीही या प्रकरणावर काहीही भाष्य करणार मनाई केली आहे. जतिनवर पुढे पोलिस कारवाई करणार का? जतिनने खरंच गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल केलंय का? याचा उलगडा लवकरच होईल. जतिन सुरी हा सुप्रसिद्ध अभिनेता असून त्याने 'एक था राजा एक थी रानी', सौभाग्यवती भव अशा मालिकांमध्ये आधी काम केलंय.

टॅग्स :टेलिव्हिजनमुंबई पोलीसपोलिसबॉलिवूडअटक