Aman Jaiswal Accident Death : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही सीरियल 'धरतीपुत्र नंदिनी' फेम अभिनेता अमन जैस्वालचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय अमन बाईकवरून शूटिंगसाठी जात होता, यादरम्यान मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातानंतर 25-30 मिनिटांतच अमनचा मृत्यू झाला.
अमन जैस्वाल उत्तर प्रदेशातील बलियाचा रहिवासी होता. अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या अमनने आपली एक ओळख बनवली. अभिनयाच्या जोरावर त्याने त्याने ‘धरतीपुत्र नंदिनी’ या शोमध्ये काम मिळवले. 2023 साली नजारा टीव्ही वाहिनीवर हा शो सुरू झाला. या शोमध्ये अमन पहिल्यांदाच लीड रोलमध्ये दिसला होता. याआधी त्याने 'उदारियां' आणि 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या टीव्ही शोमध्ये छोट्या भूमिका निभावल्या होत्या.
अभिनयाा वडिलांचा विरोध, पण आईने दिली साथअमनला सुरुवातीपासूनच अभिनेता व्हायचे होते, पण त्याने आयएएस अधिकारी, इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. अमनने अभिनेता होऊ नये, असे त्याच्या वडिलांना वाटायचे. मात्र, आईने अमनला साथ देत वडिलांनाही समजावले. अमनने अनेकदा आपल्या यशाचे श्रेय आईला दिले. मात्र, आता अमनने या जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमनच्या मृत्यूने सहकलाकारांना धक्का धरतीपुत्र नंदिनीचे लेखक धीरज मिश्रा यांनी सोशल मीडियावर अमनला अंतिम श्रद्धांजली वाहिली, 'अलविदा, तू आमच्या आठवणींमध्ये राहशील...' असे त्यांनी म्हटले. तर, 'धरतीपुत्र नंदिनी' मधील अमनचा सहकलाकार असलेल्या नवी रौतेलानेदेखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले.