Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या प्रेमात आकंठ बुडला अभिनेता अभिजीत खांडकेकर, पाहा त्यांचे रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 10:26 IST

अभिजीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नीसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी असलेली ही मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. या मालिकेत गुरुनाथ म्हणजेच  अभिनेता अभिजीत खांडकेकर. सध्या अभिजीत पत्नी सुखदा खांडकेकरसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतो आहे.

अभिजीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नीसोबतचे रोमाँटीक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिजीत आणि सुखदा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतायेत. सोशल मीडियावर दोघांच्या फोटो पसंती मिळते आहे. 

छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे.

हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.

टॅग्स :अभिजीत खांडकेकरसुखदा खांडकेकर