Join us

एक अभिनेता, 52 भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 15:24 IST

अभिनेता म्हटलं की कलाकार नवनवे प्रयोग करत असतो.. विविधरंगी भूमिका साकारत कलाकार आपल्या अभिनय कौशल्याला पैलू पाडण्याचा प्रयत्न करत ...

अभिनेता म्हटलं की कलाकार नवनवे प्रयोग करत असतो.. विविधरंगी भूमिका साकारत कलाकार आपल्या अभिनय कौशल्याला पैलू पाडण्याचा प्रयत्न करत असतात.आता रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमात वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता हृषिकेश जोशी आता रसिकांना सरप्राईज देण्यासाठी सज्ज झालाय. 'विकता का उत्तर' या नव्या गेमशोमध्ये हृषिकेश जोशी तब्बल 52 भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करणार असून 7 ऑक्टोबरपासून हा शो रसिकांच्या भेटीला येणार आहे.. 52 भूमिका साकारत असल्याच्या वृत्ताला हृषिकेशनंही दुजोरा दिला असून रसिकांप्रमाणे आपणही त्यासाठी उत्सुक असल्याचं त्यानं म्हटलंय.