Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखवर वहिनीकडून लावण्यात आले हे आरोप... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 13:04 IST

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. संजीदाच्या वहिनीने संजीदासह तिच्या कुटुबीयांवर कैटुंबिक अत्याचार केल्याचा आरोप केला ...

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. संजीदाच्या वहिनीने संजीदासह तिच्या कुटुबीयांवर कैटुंबिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. जकेराबनु जाकिर हुसैन बागबां यांनी नणंद संजीदा शेख तिचा भाऊ अब्दुल रहीम शेख आणि संपूर्ण कुटुंबीयावर कलम 125 अंतर्गत केस दाखल केली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार जकेराबनुचे म्हणणे आहे की, अब्दुल शेख तिच्या वडिलांकडून वारंवार हुंड्याची मागणी करायचा तसेच जकेराबानुला मारझोड सुद्धा करायचा. अब्दुल दारुच्या आणि ड्रग्सच्या नशेच्या अधीन गेला आहे. तो मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात सुद्धा अडकला होता असे जकेरा बानुचे म्हणणे आहे.  27 मे रोजी जकेरबानु फोनवर आपल्या वडिलांशी बोलत असताना संजीदा, तिचा भाऊ अब्दुल आणि आईने तिला मारझोड करण्यास सुरुवात केली आणि तिला मुंबईतल्या घरी राहण्यास मज्जाव केल्याचा आरोप तिने केला आहे. यानंतर जकेरा अहमदाबादला निघून गेली तिकडे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लग्न ठरताना जकेराला अब्दुलचा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले होते असे तिचे म्हणणे आहे मात्र तो नेहमीच घरी असायचा. जकेरा अहमदाबादला निघून गेल्यानंतर संजीदाच्या कुटुंबामधील एकही सदस्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नसल्याचे तिचे म्हणणे आहे. एक वेबसाईटच्या माहितीनुसार संजीदा शेख आणि त्याच्या कुटुंबीयांनी जकेराबनुने केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करणारी याचिका दाखल केली आहे. यात तिने केलेले सगळे आरोप फेटाळण्यात आले आहेत. ज्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडला त्यादिवशी संजीदा शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे तिचे म्हणणे आहे. संजीदाच्या वकिलांनी मुबंई मिररला दिलेल्या माहितीनुसार जकेराबनुची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे संजीदाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.