Join us

'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकच्या लग्नाने अरुंधतीच्या आयुष्यात येणार वादळ, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 16:18 IST

आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे.

आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे. देशमुख कुटुंब मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आले आहेत आणि तिथेच अभिषेक अनघाचा साखरपुडा पार पडणार होता. सर्व देशमुख कुटुंब आनंदी असताना त्यांच्या आनंदावर विरजन पडते आणि तेही संजनामुळे. त्यामुळे अभि-अनघाच्या साखरपुडा पार पडला नाही. दरम्यान आता आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात अभि अंकितासोबत लग्न करतो.

आई कुठे काय करते मालिकेतील नव्या प्रोमोत अंकिता सुसाइडचा प्रयत्न करते. त्यामुळे अभिषेक साखरपुडा सोडून मुंबईला येतो. त्यामुळे गावात सगळे अभि वाटत पाहत असतात. अभि गावात येतो. अनघादेखील अभिची वाट बघत असते. पण अभि एकटा येत नाही. त्याच्यासोबत अंकिताही येते आणि तेही ती सांगते की अभि आणि तिने लग्न केले. हे ऐकून घरातल्यांना सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यामुळे आता अनघा आणि अरूंधती काय करतील हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

आधीच्या भागात अरुंधती संजनाला अंकिताशी फोनवर बोलताना ऐकते त्यामुळे ती संजनाला विचारते की तू अंकिताला साखरपुड्याबद्दल सांगितलेस का, त्यावर संजना सांगते की अंकिता खूप रडत होती म्हणून मी तिला साखरपुड्याबद्दल सांगितले.

संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावते.

टॅग्स :स्टार प्रवाह