Join us

अभिषेक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 13:53 IST

राखी सावंतमुळे अभिषेक अवस्थी हे नाव चर्चेत आले. राखीचा हा पूर्वप्रियकर जुगली चली जलंदर या मालिकेत झळकला होता. या ...

राखी सावंतमुळे अभिषेक अवस्थी हे नाव चर्चेत आले. राखीचा हा पूर्वप्रियकर जुगली चली जलंदर या मालिकेत झळकला होता. या मालिकेनंतर तो आता डॉ. मधुमती ऑन ड्युटी या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेत तो आशिष रॉयच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. अतिशय धुर्त अशा मुलाची ही भूमिका आहे. मधुमतीसोबत लग्न करण्यासाठी तो अनेक खोट्या गोष्टी सांगणार आहे. पण मधुमतीवर प्रेम करणारा डॉ. मोहन म्हणजेच विपुल रॉय अभिषेकचा खरा चेहरा मधुमतीसमोर आणणार आहे. या सगळ्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसण्याची चांगलीच संधी मिळणार आहे.