Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तो अध्याय तिथेच संपला…", मराठी अभिनेत्रीसोबत साखरपुड्याच्या चर्चा ऐकून प्रसिद्ध युट्यूबर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:16 IST

मराठी नायिकेसोबत जोडलं जातंय नाव! साखरपुड्याच्या चर्चांवर युट्यूबर अभिषेक स्पष्टच बोलला,"तीन वर्षांपूर्वी…"

Abhishek Malhan: लोकप्रिय युट्यूबर अभिषेक मल्हान हे नाव 'बिग बॉस ओटीटी २' सीझनमुळे घराघरात पोहोचलं. अलिकडेच्या या दिवसांमध्ये अभिषेक त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आला आहे. याच शोमध्ये मराठमोठी अभिनेत्री जिया शंकर देखील सहभागी झाली होती. शो संपल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा होत्या. इतकंच नाहीतर य दोघांच्याही साखरपुडा झाल्याच्या बातम्या सगळीकडे वाऱ्यासारख्या पसरल्या. या सगळ्या अफवांवर जियाने स्पष्टीकरण दिलं. मात्र,अभिषेकने शांत राहणंच पसंत केलं. आता या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा जोर धरू लागल्याने अभिषेकने मौन सोडलं आहे.

अभिषेक मल्हानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत जिया आणि त्याच्या डेटिंग रुमर्सविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हे दावे निराधार ठरवत कोणत्याही कारणाशिवाय या प्रकरणात आपलं नाव ओढणं नये,असं आवाहन लोकांना केलंय. अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहून त्यामध्ये म्हटलंय,"मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, कृपया माझं नाव कोणाशीही जोडू नका. मी तीन वर्षांपूर्वी त्या शोचा एक भाग होतो आणि तो अध्याय तिथेच संपला. माझा निर्णय सुरुवातीपासूनच स्पष्ट होता आणि त्यात तेव्हापासून कोणताही बदल झालेला नाही."

अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये असंही लिहिलंय की, जेव्हा त्याच गोष्टी वारंवार घडतात, तेव्हा खूप वाईट वाटतं.शिवाय त्याने हे सुद्धा स्पष्ट केलंय की, त्याला अशा कोणत्याही चर्चांचा भाग व्हायचं नाही.

जिया शंकर काय म्हणालेली?

जियाने या फोटोसोबत कॅप्शन दिले की, "चला, २०२५ मध्ये या खोट्या अफवा सोडून देऊया". तिच्या या एका वाक्याने हे स्पष्ट झाले आहे की, अभिषेक मल्हानसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. दरम्यान, जियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने तो नेमका कोण आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया